भाजप नेत्या पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागली आहे. पक्षाकडूनही त्यांना वारंवार डावललं जात असल्याचंही बोललं जात आहे. अशातच भाजप आणि शिवसेनेच्या बीडमधील सावरकर गौरव यात्रेत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे गैरहजर राहिल्या. बीडमध्ये भाजप-शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा मोठया उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात स्थानिक नेते मंडळींची उपस्थिती होती. मात्र, पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे या दोघी भगिनींची सावरकर गौरव यात्रेतील अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
#Savarkar #PankajaMunde #PritamMunde #Beed #BJP #EknathShinde #Ayodhya #Shivsena #YogiAdityanath #Maharashtra #Mumbai #DevendraFadnavis #KiritSomaiya #AdityaThackeray #NCP #AslamShaikh #MadhIsland #Malad #HWNews